Back to feed
T
Tara Bagale Love · Marathi · Romantic

पाहताना तुला हरवतो मी जेव्हा, भान तेव्हा माझे होशील का ? मुक्या त्या शब्दांचे...नाव तुझे होऊन, ओठी माझ्या येशील का ? गुणगुणावे वाटते मला, गीत तेव्हा माझे होशील का ? सूरात मिसळून माझ्या, एकसूर तू होशील का ? स्पर्श होतो पहिल्यांदा जेव्हा, पावसाचा या धरे ला, गंध तेव्हा दरवळणारा तू होशील का ? अलगद हळुवार उठता उठता, श्वासात माझ्या उतरशील का ? मावळतीचा सूर्य जेव्हा क्षितिजाला टेकतो, आकाशातला तेव्हा रंग केशरी तू होशील का ? सांजवेळी या अशा किनारा मी, अन लाट तू होशील का ? आठवणींची कुपी मी उघडतो जेव्हा, गालावर तेव्हा नकळत उमटणारे हसू तू होशील का? चांदराती अंगाला या झोंबणारी, गार झुळूक तू होशील का ? बोबडे बोल लहान मुलं बोलतात जेव्हा, त्यांचे तेव्हा निरागस डोळे तू होशील का ? एकट्याने चालायची वाट ही सारी...तरी, हात हाती घेऊन साथ तू देशील का ?

0 likes 0 shares
WhatsApp