पहील प्रेम श्रावणसरींसारख तन भिजेल पण मनास जागवणारं पहील प्रेम वैशाखाच्या उन्हासारख सावलीतअसल तरी चटका देणारं पहील प्रेम काजव्यासारख स्वतः प्रकाशित असूनही अंधाराकडे धावणारं पहील प्रेम थंड बर्फासारख हात न लावताही विरघळणारं पहील प्रेम वार्यासारख सुगंधसोबत घेणारं कूणालाच न दिसणारं पहील प्रेम निरागस मुलासारख मनात असुनही मोठं न होता येणारं पहील प्रेम भ्रमरासारख फुलाभोवती घुटमळुन जीव देणारं
143 likes
56 shares