Back to feed
D
Diya Singh Love · Marathi · Romantic

पाहीलं मी तुला,माझ्यावर प्रेम करताना. . ते नातेअनामिक तु अनावर जपताना. . पाहीलं मीतुला तु एकांतात असताना, माझ्यासाठीझुरताना. . तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात, तुला माझंचित्र पाहताना. . ओढ्याकिनारीफुलपाखरांशी, गप्पा मारताना. . माझे प्रतिबिंबसमजून, तूलास्वतःशीच बोलताना. . पाहीलं मी तुला, खळखळून हसताना. . भरभरून जगताना. . माझ्या दुःखाला कवटाळून, तुला मुसमुसून रडताना. . तू नशिबाशीलढताना, प्रत्येक वेळीजिंकताना. . प्रेमासाठीमाझ्या मात्र, तुलावेळोवेळी हरताना. . पाहीलं मी तुला, माझ्यावर प्रेम करताना. .

0 likes 0 shares
WhatsApp