बाईनी ५ वीच्या मुलाना गृहपाठ दिला :"उद्या येताना आईवडिलांची केलेली एखादी गोष्ट आणि त्याचे तात्पर्य समजावून घ्या. प्रत्येकानी वर्गात उभे राहून ती गोष्ट सर्वाना मोठ्यांदा सांगायची आहे..!" ...दुसरे दिवशी प्रत्येक मुलानी, नासलेले दुध, उतू गेलेले दुध, फाटलेले कपडे, आईवडीलानी पै पै वाचवण्या साठी किती व कसे कष्टात दिवस काढले त्याचे रसभरीत वर्णने केले... "मार्गारेट" एका कोपर्यात बसून ते सर्व नीट ऐकत होती... तिच्या चेहर्यावरती कोणत्याच प्रतिक्रिया नव्हत्या... शेवटी ती एकटीच उरल्यावर बाईनी विचारले, "मार्गारेट, तू कोणती गोष्ट सांगणार आहेस..?" मार्गारेट म्हणाली, "माझी आई फायटर विमानाची वैमानिक आहे, वडिलांनी मला "आईची शौर्य कथा" सांगितली..!" . बाई पटकन म्हणाल्या "हो..? कोणती ग..? सांग सांग..! आम्हाला पण ऐकू दे..!" "आईची इराकच्या युद्धातील शौर्यकथा आहे... "आई f16 विमानातून बगदाद वर मिसाईल वापरून हल्ला करत असताना, आखातात होणाऱ्या वाळूच्या वादळामुळे F16 बिघडले... मग काय आईला विमातून उडी मारावीच लागली... कोणत्याही फायटर वैमानिकाकडे पॅराशुट असतेच त्याशिवाय, एक पिस्तोल, एक धारदार चाकू आणि थंडी पासून संरक्षण करण्यासाठी एक व्हिस्कीची क्वार्टर बाटली पण असते..! पॅराशुट वापरून उतरताना आईच्या लक्षात आले की ती जर का वेडीवाकडी जमिनीवर पडली तर तिच्या खिशातील व्हिस्कीची बाटली फुटेल... आणि काचा लागून ती जखमी होईल आणि शत्रूच्या हातात सहज सापडेल... तिने एक सेकंद सुद्धा वाया जावू न देता, हवेत असतानाच व्हिस्कीची बाटली उघडून पिवून टाकली व जमिनीवर फेकली... ती बाटली ज्याच्या डोक्यावर पडली तो इराकी क्षणात मेला असे तिला तिच्या दुर्बिणीतून दिसले... पॅराशुट च्या साह्याने ती जमिनीवर उतरली तो नेमका इराकी सैनिकांचा अड्डा होता.. तिला त्यातील सर्व २० इराकी सैनिकांनी तिला घेरले... आईने डोळ्याची पापणी लवायच्या आधीच पिस्तोल मधून फायारिंग सुरु केले... आणि १५ इराकी सैनिक जागीच मारले... पिस्तोल मधील गोळ्या संपल्या हे लक्षात आले पण उरलेले ५ जण तिच्यावर धावून येत आहेत हे तिने बघितले... तिने क्षणाचाही विलंब न करता चाकू उघडला आणि एकेकाला भोसाकायाला सुरवात केली...व ४ जणाना यमसदनाला पाठवले... चौथ्या इराक्यावर चाकू हल्ला करताना, चाकू त्या इराक्याचा हाडाला लागल्याने चाकू तुटला... मग आईने तिचे कराटेचे सर्व ज्ञान पणाला लावून शेवटच्या इराकी सैनिकावर जोरदार हल्ला केला व त्याचा गळा दाबून जीव घेतला... तिने तिथल्या एका कपाटातून इराकी ड्रेस घातला व तिथली एक मोटारसायकल घेवून ती अमेरीकन बेस वर सुखरूप परत आली... या शौर्याकरता तिला प्रेसिडेंट ने विशेष प्रशस्तीपत्रक व डबल बढती सुद्धा दिली... क्षणाच्या शांतते नंतर ५-६ मिनिटे, सर्व मुले टाळ्या वाजवत होती .... पुन्हा शांतता प्रस्थापित झाल्यावर बाईनी विचारले.... " मार्गारेट...यातून तू काय धडा घे असे वडिलांनी सुचवले..?" मार्गारेट ने इकडे तिकडे बघितले व हळू आवाजात म्हणाली... वडील म्हणाले... . "बाई दारू प्यायली असेल तर तिच्या वाटेला जावू नये..!!!" 😇😇
104 likes
2 shares