Back to feed
R
Riya Sharma Love · Marathi · Romantic

बैंक पैसे देत नसल्यामुळे वैतागलेल्या नव-याने आपल्या पत्नीला लिहिलेली कविता.... (पत्नीने घरखर्चात व डामडौलात काटकसर करावी यासाठी पतीचा हा अट्टाहास) 👚👗👕 "लाडके" कशासाठी गं तू नवे नवे "कपडे" शिवतेस? अगं.. जुन्या साड्यांमध्ये तर तू "अप्सरा" दिसतेस! 💄👡💇 ब्यूटी पार्लरच्या चक्रात खरोखर तू पडू नकोस चंद्रासारख्या सुंदर शीतल चेहऱ्याला तू कुठलीही क्रीम लेपू नकोस! 🍎🍊🍏 अगं सफरचंदासारखे गुटगुटीत गोरे गाल तुझे पावडर क्रीमची गरज काय एकदा सखे ऐक माझे! 🍲🍛🍪 हॉटेलच्या जेवणामध्ये अशी कुठली चव आहे? तुझ्या हातच्या स्वयंपाका राणी "अमृताची" चव आहे! 💃💪🏃 "धुणीभांडी"वाल्यांच्या नादाने तब्बेत नको खराब करू हातात झाडू घेवून आता दोघेही कसे व्यायाम करू! 💍🏅🔶 सोने चांदीचे अलंकार कुरुपांसाठी बरे आहे निसर्गसुंदर रुप तुझे सोन्यापेक्षाही खरे आहे! 💶💰💴 "पैसापैसा" करू नकोस तो तर "मोहलक्ष्मी" आहे माझ्या घरच्या अंगणाची तू खरी "धनलक्ष्मी" आहे! 💁🍆🍅 जेवणात तीन तीन भाज्या काहींची सवयच ही प्यारी एकाच तुझ्या भाजीला प्रिये चव असते न्यारी! 💰👨‍👩‍👦‍👦🙋 राज्याच्या आर्थिक संसाराचे शासनाचे तोकडे ग्यान आहे कमी खर्चात घर चालवण्याचे तुझ्याकडे खरे ज्ञान आहे 👹🌸🙂 नको बोलावू माहेरच्यांना हे गाव भुतासारखे काटते सुटीत जावू तुझ्या माहेरी तिथे स्वर्गासारखे वाटते! 😌☺🙆 कुणा कशाचा तर कुणा कशाचा अभिमान आहे बायकोच्या काटकसरीचा मला खरा स्वाभिमान आहे! (कवी- बैंक पैसे देत नसल्या मुळे वैतागलेला नवरा)

51 likes 46 shares
WhatsApp