बघ , प्रसारमाध्यमांतून तुला कसं रंगवल जातयं ! नको त्या गोष्टींच भांडवल करून न्युनत्व रूजवल जातयं . म्हणे तूं हवी गोरी अन कमनीय देहाबोली ओठ गुलाबी अन डोळ्यांची भाषा निराळी जणू तू म्हणजे फक्त " शरीर " असंच बिंबवल जातयं या सगळ्यात तुझ " तू " असणं हरवतं जातयं तूं घालावेस कोणते कपडे अन टाकावे कितीे अंग उधडे हे सारं परस्परच ठरवल जातयं या सगळ्यात तुझ " तू " असणं हरवत जातयं तुझ काम कधी त्याला आकर्षित करणं तर कधी , तत्सम सौंदर्यस्पर्धांतून भुरळ पाडणं यातून तुझ मादीपणच ठ्ळक अन अधोरेखित केल जातयं या सगळ्यात तुझ " तू " असणं हरवत जातयं खरं तर तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस कारण , तुझ्यात आहे सर्जनाचं आंदण संवेदनशीलतेचं कोंदण जाणीवेचं स्पंदन अन स्वत्वाचं बंधन मात्र दिशाभूल करून , तुला शोभीवंत बाहुली बनवलं जातेयं अन या सगळ्यात तुझ " तू " असणं हरवत जातयं ...
142 likes
50 shares