Back to feed
M
Manav Das Love · Marathi · Romantic

बदल तर झालाय पण, कोण बदललं तेच कळत नाही कदाचित तुझ्यासाठी मी, माझ्यासाठी तु अन् लोकांसाठी दोघंही! आधीसारख्या रंगत नसल्या गप्पा, नसला जरी तो बोलण्यातला मोकळेपणा तरी मोजक्याच शब्दांतून तुझ्या, दिसतात सध्या काळजीच्या खाणाखुणा माझ्या कमी झालेल्या बोलण्यात सुद्धा, मला आता औपचारिकता जाणवते अन् तुझ्याबद्दल काळजी दर्शविण्याची, माझी न राहिलेली जुनी सवय मला आठवते स्वतहुन मेसेज पाठवतेस, अन् खूप काही बडबडतेस मला कोड्यात टाकण्यासाठीच की काय, मध्येच बोलणं बंद करतेस तुझ्या मध्येच गप्प होण्याचा, विचार मग मी करत बसतो भूतकाळ आठवून मग मी, बदल फ़क़्त शोधत बसतो अचानक येणारा तुझा मेसेज, न अपेक्षित असतो ना नियमित असतो तरीसुद्धा काही क्षणांसाठी, मला भरपूर आनंद देऊन जातो कधी कधी वाटू लागतं, बदललंय माझं प्रेम अन् बदललोय मीही. पण हा आनंद सिद्ध करतो, मनात माझ्या तुझी जागा आहे तीच अजुनही...

0 likes 0 shares
WhatsApp