Back to feed
K
Kunal Malhotra Love · Marathi · Romantic

बाबा एक असतो बाबा तो खूप छान असतो त्याच्या बोटात जादू असते तो खुपसार्या कलात तरबेज असतो तो छानछान चित्रे काढी तो सुरेल गाण म्हणे त्याच्या पेटीतून बासरीतून निरागस सूर येत त्याला सुंदरतेचा ध्यास होता तो सुबक मोहक मुर्ती घडवे सतत गाण गुणगुणत काम करे त्याचे जग शांत आणि समाधानी असे तो सर्वाना मदत करे त्याला सगले बाबा म्हणत एकदा काय झाले? बाप्पा त्याला म्हणाला मला तू इतके छान घडवतोस तू मला खुप आवडतोस आता तू माझा बाबा हो मग बाबाने काय केल? आपल्याकडची सगली कला वाटुन टाकतो... सगल्यानी आनंदाने एकत्र रहावे म्हणून एक मोठ्ठ घर बांधतो.... सर्वाना खूप आशिर्वाद देतो आणि जातो बाप्पाकडे... त्याचाही बाबा होण्यासाठी......

0 likes 0 shares
WhatsApp