Back to feed
R
Reyansh Agarwal Love · Marathi · Life

बाबा तुंम्ही नेहमी पडद्या मागेच का हो राहता...... बाबा आजवरं घरातं कुठेही केंव्हाही, आईचेच का हो गुणगानं गातातं | तुंम्ही बिचारे एवढे कष्ट करुन देखील, तुंम्ही नेहमी पडद्या मागेच राहतातं || मग एवढे कष्ट करुन तुंम्ही नेहमी...... आई बरोबर तुंम्हीही असता मगं येवढं, का आईच्याच नावे हंबरडे फोडतात | तुंम्ही तर आपल्या कुटुंबा साठी दुरचा, प्रवास करुन आपले कंबरटे मोडतां || मगं एवढे कष्ट करुन तुंम्ही नेहमी...... सकाळच्या पारी थंडीतुन तुंम्ही कुडकुडतं, जीवाची पर्वा न करता बे धडकच जाता | नाही चहा,नाही न्याहरी करीत तरी तुंम्ही, आंमच्या साठी ऊपाशी पोटी निघुन जाता || मगं एवढे कष्ट करुन तुंम्ही नेहमी....... काही दुखलं खुपलं,काही लागलं तरी, नेहमी आईचीच आठवण कशी होते | पण त्याच दुखण्या,खुपण्यात बाबा, आंमच्याकडे लक्ष बरोबर वेधुन घेता || मगं एवढे कष्ट करुन तुंम्ही नेहमी....... आला सणवार कि कुणाला काय हवं, नको ते अगदि मनापासुन विचारता | आयुष्य भर नोकरी करता तरी पण, तुंम्ही स्व:ता मात्र तसेच का हो राहता || मगं एवढे कष्ट करुन तुंम्ही नेहमी....... आलं मुलाचं लग्न किंवा असो मुलीचं लग्न,, कि तुंम्हाला झोपही साधी लागत नाही | चेहऱ्यावरचा हाव भाव मात्र तुंमचा तसाच, तरी बाबा हे सगळ तुंम्ही कसं हो सोसता || मगं एवढे कष्ट करुन तुंम्ही नेहमी....... किती तरी तानतणाव असलात तरी तुंम्ही, जराही चेहऱ्यावर तुंमच्या दिसत नाही | गरीबीतुन दिवस काढले तुंम्ही तरी न, संकटाला ही तोंड देता तेही न डगमगता || मग एवढे कष्ट करुन तुंम्ही नेहमी....... तुंमच्या मेहणतीला मोल नाही बाबा हे आंम्हाला अजुन तरी कळणार नाही | कितीही शरीराला ताण पडला तरी तुंम्ही आमच्याशी हसतं खेळतच राहता || मगं एवढे कष्ट करुन तुंम्ही नेहमी....... न खंड पडता अखंड चालवीली तुंम्ही तुंमच्या मना प्रमाणे संसाराची भिंत | तुंमच्या ईच्छे प्रमाणे आंमच शिक्षण झालचं नाही बाबा एवढीचं मनात खंत || मगं एवढे कष्ट करुन तुंम्ही नेहमी....... बाबा एवढीचं मनात खंत..... बाबा एवढीचं मनात खंत.....

0 likes 0 shares
WhatsApp