Back to feed
D
Diya Yadav Love · Marathi · Romantic

*** बायको माहेरी जाईना*** गेला दसरा गेली दिवाळी दिवस स्वातंत्र्याचा येईना.... काय करु सांगा मित्रांनो काही केल्या बायको माहेरी जाईना... किती सांगितलं दमलीस खूप आता माहेरी जाऊन आराम कर,जरा. म्हणते इतकच असेल,प्रेम माझ्यावर तर तुम्हीच स्वयंपाक भांडी करा.. अर्थ माझ्या म्हणण्याचा ध्यानात तिच्या येईना.... काय करु सांगा राव बायको माहेरी जाईना.... सारखे लावतोय गाण फिरवून फिरवून आपण मामाच्या गावाला जाऊया.... मला म्हणते किती छान स्वभाव तुमचा चला भाचा भाचीला बोलवून घेऊया... तगमग माझ्या मनाची समजून ती घेइना,.:.. काय करु सांगा तुम्हीच बायको माहेरी जाईना किती सांगितलं तिला प्रिय भाऊ तुझी तिथं तुझी वाट पाहत असेल.. काळजी नका करु म्हणते मला तुम्ही सकाळी तो पहिल्याच गाडीला बसेल.. फारच हट्टी समजून काही घेईना मगाशी बसवली कशी तरी गाडीत तिला अशी लावून लाडीगोडी... पण फारच प्रेम माझ्यावर तिचे बघा मारली चालू गाडीतून उडी ... मित्रां बरोबर पार्टी करण्याचा योग काही येईना... काय करु बायको माहेरी जाईना...😀😀😜

86 likes 57 shares
WhatsApp