K
Krishna Iyer
Heartbreak · Marathi · Heartbreak
बैरागी देव बांधुनिया गाठी चाले निवांत बैरागी जग हलते डुलते नित्य निश्चल नियोगी लक्ष्य अलक्षी लागले ध्यान शून्यात गुंतले पथ मावळले सारे प्राण आकाशी विरले काय मागचे पुढचे बंध सुटले युगाचे आत एकांत विरुढे काम मिटले जगाचे देव भरवतो घास पेरी पावुलात वाट खांदी घेवूनीया मेघ वात चालला वाहत काय आकार विकार नाना रंगांचे विभ्रम घडो घडे तैसे आता फेऱ्या पडला विराम दत्त होऊनिया स्वप्न शून्यी हरवले मन सर्व तत्वांचा पसारा एका बिंदूत मिटून
146 likes
13 shares