बैल आमुचा देव बरं झालं देवा.. एक उपकार केला आम्हा शेतक-याले बैल तूनं दिला.. कशी वाह्यली असती शेती... जर नसता बैल । धडापासून मान आमुची... झाली असती सैल ।। बैलाशिवाय वाली आमुचा.. कोणी नाही दुसरा । म्हणूनच सलामत राहयला.. आमुच्या नावानं खसरा ।। वखरता...डवरता... रोज त्याले ढोसतो । रक्त बंबाळ होऊनही... मार मुकाट्यानं सोसतो ।। त्याले माहित हाये.. देवा.. शेतकरी राब..राब..राबतो । स्वतः उपाशी राहून... अख्ख्या जगाले पोसतो ।। म्हणूनच तो कधी... सांगत नाही गा-हाणी । फक्त माह्याकडे पाहून... डोळ्यात आणते पाणी ।। मी ही खुप स्वार्थी..देवा... फक्त त्याच्याकडे पाह्यतो । पैशाची गरज पडली... तर..त्यालाच विकून टाकतो ।। माह्याकडे त्याच्याशिवाय.. दुसरी नाही.. हमी । आमुचेचं लेकरं सत्तेवर... पण..पडत नाही कामी ।। देवा...त्याच्या शेणमुतापासून... प-हाटीले येते..पाती । म्हणूनच भक्त तुह्यापुढे रोज पेटवते वाती ।। असा माह्या बैल... देवा.. तुहयासाठी... जीव हाये । ज्याच्या कष्टावर जग जगते... तो बैल आमुचा देव...हाये..।। तो बैल आमुचा देव.. हाये..।।। माझ्या सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा....!
0 likes
0 shares