Back to feed
V
Vanya Kapoor Love · Marathi · Life

बोलावं म्हटलं कोणाला मन स्थिर नाही माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही साचावी म्हटलं आशा फळ मिळेल काही ठेचाळती जखमा वेदना सहन होत नाही शोधावं म्हटलं स्वप्नांचं क्षितिज खऱ्या स्वप्नांचा भास ही होत नाही द्यावं म्हटलं सुख नावाचे आंदण जडावले मन सुख मानायला तयार होत नाही सांगावं म्हटलं मनातलं सारं पण ऐकायला कोणी तयार होत नाही घे म्हटलं विश्वास समजून विश्वास रुजायला तयार होत नाही सांग म्हटलं प्रतिमेला तुझ्या मनातलं सारं ती सारे निमूट सहन करूनही व्यक्त होत नाही रेखावं म्हटलं चित्र मनचक्षूवर तुझं अपराधी मन रंग भरायला तयार होत नाही मनाला म्हटलं बस कर आता नको अंत पाहू वेडे मन आशा सोडायला तयार होत नाही जावे म्हटलं स्मृतींच्या वाटेने अन हळूच थांबावे वेळ गेली आता हार स्वीकारायला मन तयार होत नाही

0 likes 0 shares
WhatsApp