Back to feed
N
Nikhil Iyer Love · Marathi · Romantic

बळ पंखामध्ये भरुनी, भिडतील पिले गगनाला तेव्हा घरट्यातुन त्यांना,भरल्या डोळ्यांनी पाहू होता स्वप्नांची पुर्ती ,निवृत्त घरातुन होऊ वय झाल्यावरही अपुले, प्रेमात नव्याने राहू... भरगच्च तरुंनी हिरव्या ,सजलेला तलाव शोधू त्या निळ्या तळावाकाठी , झोपडी आपली बांधू "तू तिथे मी " असे नांदू ,आजन्म सुखाने नाहू वय झाल्यावरही अपुले, प्रेमात नव्याने राहू वय विसरुन तुडवू वाटा, हातात हातही घेऊ सागरी किनारा, लाटा , अंगणी आपल्या नेवू पुस्तके तुझी आवडती, वाचू ...आनंदे गाऊ वय झाल्यावरही अपुले, प्रेमात नव्याने राहू तारुण्य तशी ही साठी, हातात वयाची काठी मी जगेन तुझियासाठी, तू जगशिल माझ्यासाठी डोळ्यांनी बोलू काही , स्पर्शांनी माया देवू वय झाल्यावरही अपुले, प्रेमात नव्याने राहू... मी गजरा मधुचंद्राचा, येईल हळूच बांधाया नथ काकण हिरवा शालू, तू काढ कधी नेसाया पुणवेच्या रात्री जागू , स्पंदने नभाला वाहू वय झाल्यावरही अपुले, प्रेमात नव्याने राहू...

68 likes 70 shares
WhatsApp