Back to feed
N
Nikhil Mehta Love · Marathi · Romantic

भाऊ भाऊ..... दोन भावांची भांडणे झाली... अनेक दिवस ते एकमेकांशी बोलत नव्हते... एकमेकांना नावे ठेवायचे... हे मला समजले... चौकात एकाला बोलावून घेतले.. काय झाले विचारले... शिव्या देत त्याने भावाबद्दल सांगितले... मी म्हटले थांब... तिथून मि दुसऱ्या भावाला फोन लावला... कुठे आहेस तु... शेजारच्या गावात होता... त्याला सांगितले... अरे, चौकात तुझ्या भावाचा अपघात झालाय... असे सांगून फोन बंद केला... पुढील दहाच मिनीटात तो भाऊ चौकात हजर... घाबरलेला... घामाने भिजलेला... शेजारच्या गावातून गाडी मिळाली नाही म्हणून धावत आला.... आता दोघ भाऊ समोरासमोर उभे... दोघांच्या डोळ्यांत पाणी... तुला काही लागलं तर नाही ना.. किती घाबरलो मी... नाही दादा, पण मला माफ कर... आणि दोन्ही भाऊ एकाच मिठीत विसावले... शेवटी भाऊच आला ना धावत... ह्या बोटाची रग त्याच बोटाला आली ना... पाण्यात काठी मारली म्हणून का पाणी वेगळे होते... भाऊ तो भाऊच... नंतर दोघांच्या शिव्या मी खाल्ल्या.. अस आहे आपले .. भावाला भावाशी जोडणारे... आता मला सांगा . जर सगळे भाऊ भाऊ म्हणून राहीलो तर किती बरे होईल. हो ना... मग दुसरा कसा वागतोय हे पाहण्यापेक्षा आपण चांगले वागू.... पटले तर विचार करा...

35 likes 64 shares
WhatsApp