Back to feed
T
Tara Bhat Season · Marathi · Shivaji_Pride

भाग्यवान कोण ? राजा दशरथ जेव्हा आपल्या चारही मुलांची वरात घेऊन जनक राजाच्या दारात पोहोचले तेव्हा जनक राजाने सन्मानपूर्वक वरातीचे स्वागत केले. त्याच क्षणी दशरथ राजाने पुढे येऊन जनक राजाचे पाय धरले. आश्चर्यचकित होऊन जनक राजाने दशरथ राजाचे हात पकडून घेतले आणि म्हणाले, महाराज तुम्ही मोठे आहात आणि वरपक्षाकडचे आहात, असं कसं वागताहात ? यावर दशरथ राजा खूप सुंदर बोलले, ते जनक राजाला म्हणाले, महाराज तुम्ही दानशूर आहात, कन्यादान करताहात, मी तर तुमच्या दारात कन्या घ्यायला आलो आहे. आता तुम्हीच सांगा देणारा आणि घेणारा यात कोण मोठं आहे ? हे ऐकून जनक राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अर्थात भाग्यवान तेच आहेत, ज्यांच्या घरी मुली असतात...😊👭👭👭☺ " जागतिक_महिला_दिनाच्या " "हार्दीक शुभेच्छा"

70 likes 85 shares
WhatsApp