भेट...... भेट तुझी-माझी प्रलंबित - विलंबीत, दोघांनाही अनपेक्षीत, सोज्वळ तरी साग्रसंगीत, भेट तुझी-माझी... तुझा परिचय देणारी, पहिल्याच भेटीत, तुझ्याबद्दल "विश्वास"देणारी, भेट तुझी-माझी.... तसे पहायला गेले तर , भेटी बऱ्याच होतात, काळजावर "एकमेव" कोरलेली भेट तुझी-माझी ..... नियतिने निश्चित केलेली, तुझ्या-माझ्याही नकळत, आपल्याला नजदीक आणणारी भेट तुझी-माझी....
0 likes
0 shares