Back to feed
N
Nikhil Mehta Love · Marathi · Romantic

भेट आपली शेवट्ची असुन , निरोप मी घेत आहे... वरुन शांत असलो तरी ह्र्दयात मात्र रडत आहे... तु जात आहेस सोडुन मला, पण आज नाही अडवणार मी तुला... असशील तिथे सुखात रहायाच्या शुभेच्छा देतो तुला... निरोप तुला देताना अश्रु माझे वाहतील... नकळंतच काऴजाच्या तुकड्यांनाही सोबत वाहुन नेतील... त्या वाहणार्य़ा अश्रुतही प्रतिबिंब तुझेच असेल... निट निरखुन पहा तु त्याला त्यात प्राण मात्र तुला दिसेल... वाट आपली दुभंगली आता परत भेट होणे शक्य नाही... प्रवास जरी आपला एक असला , तरी आता मार्ग एक होणे शक्य नाही... माझी आठवण तु ठॆवु नकोस, मी तुला कधीच विसरणार नाही... भेटणे तुझे नी माझे अशक्य असले तरीही मी तुझी वाट पाहणे सोड्णार नाही... जात आहेस तर जा , पण जाताना निदान एवढे तरी सांगुण जाशील का? भेट्लो जर आपण कधी... तु ओळख तरी मला देशील का? जाता जाता थोडे तरी... मागे वळुण पाहाशील का? प्रत्यशात शक्य नसले तरी... डॊळ्य़ानी मात्र तु बोलशील का? कदाचीत बोलली नाहीस तु जरी… तरी नजर तुझी बोलेल का? गोधंळलेल्या अत:करणाची… खबर मला सांगेल का? कुठॆतरी तुझ्या ह्र्दयात इतिहास सारा तु आठवशील, तो आठवण्या पुरता तरी तु नक्कीच माझी राहशील... मला नजरेने जरी ओळखलेस तु... तरी शब्दानीं मी बोलणार नाही तुझ्या माझ्या आयुष्यात... आता नसतीच वादळ असणार नाही... नेहमीच पराभव झाला तरी... हक्क तुझ्यावर सांगणार नाही. पण तुझी शपथ पुन्हा प्रेम करणार नाही... तुझी शपथ पुन्हा प्रेम करनार नाही... तुम्हाला Post आवडली तर नक्की Like करुर Comment करा

0 likes 0 shares
WhatsApp