Back to feed
S
Sara Patel Love · Marathi · Romantic

मी अस्वस्थ तू शांत मी नुस्ती बडबड तू असह्य एकांत मी रागीट तू थंड मी चढलेला स्वर तू कानडोळे बंद मी मिनिट तू तास मी गं मनधरणी तुझा स्वत:ला त्रास मी जवळ तू लांब मी आवेगाने मिठी तुझा आवेश ठाम मी हताश तू जिद्द मी अगतिक वेडा तुझे थांबव युद्ध मी शपथ तू राणी मी ओंजळ चेहरा तुझे दाटले पाणी मी हळवा तू चिंब मी तान्हेला चकोर तुझे चांदंणं बिंब मी नि:श्वास तू श्वास मी स्पर्श ओठी धारा तू मोकळे आकाश मी अर्पण तू वाण मी एकटा अपूर्ण तू आधार सुजाण

182 likes 68 shares
WhatsApp