मी का तुला पाहू ? का सुंदर दिसतेस म्हणून ? का तुझं मन सुंदर आहे म्हणून? माझ्या सुन्या जिवनात.. आभाळातल्या चांदण्यात.... समुद्राच्या लाटेत... मी का तुलाच शोधू ? का सुंदर दिसतेस म्हणून ? तुलाच आठवून... डोळ्यात साठवून... तुझेच हसू... मी का तुझ्यातच रमु ? का सुंदर दिसतेस म्हणून? तू जेव्हा नसतेस... तेव्हा तुच मला छेडतेस... तुझ्याच स्पर्शाने ह्रिदय धडधडते..... या छळन्याचे मी आनंद का मानू? का सुंदर दिसतेस म्हणून ? डोळ्याचे पारणे फिटले मनाच्या कॅमेऱ्यात पहिल्यांदा जेव्हा तुज टिपले.... तुझ्या निळ्या डोळ्यातच... निरागस चेहऱ्यातच...... माझे संपूर्ण विश्व सामावून.... मी का तुलाच पाहू ? का सुंदर दिसतेस म्हणून? नाही... तुझं मन सुंदर आहे म्हणून
0 likes
0 shares