मी कशाला जन्मलो? - चुकलेच माझे! ह्या जगाशी भांडलो! - चुकलेच माझे! मान्यही केलेस तू आरोप सारे, मीच तेव्हा लाजलो! - चुकलेच माझे! सांग आता, ती तुझी का हाक होती? मी खुळा भांबावलो! - चुकलेच माझे! भोवतीचे चेहरे सुतकीच होते, एकटा मी हासलो - चुकलेच माझे चालताना ओळखीचे दार आले.. मी जरासा थांबलो! - चुकलेच माझे! पाहिजे पूजेस त्यांना प्रेत माझे! मी जगाया लागलो! - चुकलेच माझे! वाट माझ्या चार शब्दांचीच होती.. मी न काही बोललो! - चुकलेच माझे! सुरेश भट
0 likes
0 shares