Back to feed
T
Tara Joshi Love · Marathi · Romantic

*** मी तुझ्यात *** ---------------- नको धरूस रुसवा सोडून दे बहाणे, सलते मनास माझ्या तुझ्याविना रहाणे !! भासे मनात माझ्या वारा बनून यावे, रुळत्या बटेस तुझ्या गोंजारूनी पहावे !! श्वासासमीप यावे हृदयी तुझ्या थिजावे, स्मितहास्य बनूनी ओठी तुझ्या वसावे !! निळ्या नयनी तुझ्या अश्रू बनून जावे, गोर्‍या कांती सवे सावली परी रहावे !! चंद्रवदनी तुझ्या तीळ गाली बसावे, धुंद केवडा बनूनी केसातूनी रुजावे !! गोड आवाज लेवूनी कंठी तुझ्या उरावे, प्रीतीचे गोड गाणे प्रेमात धुंद गावे !!

180 likes 73 shares
WhatsApp