Back to feed
I
Ishaan Reddy Love · Marathi · Romantic

मी नाही म्हणत, तू फक्त माझी असावी... पण माझ्या जीवनात तुझ्या खेरीज कुणी नसावी...!! मी नाही म्हणत, तू मलाच आठवावं... पण तू मात्र सदैव माझ्या स्मरणात रहावी...!! मी नाही म्हणत, तू मला मनात ठेवावं... पण माझ्या मनी मात्र तूच वसावी...!! मी नाही म्हणत, तू माझ्यासाठी रडावं... पण माझी पापणी मात्र तुझ्याचसाठी भिजावी...!! मी नाही म्हणत, तू कधी हसू नये... पण माझ्यासाठी हसण्याचे कारण मात्र तूच असावं...!! मी नाही म्हणत, कधी तू माझ्यासाठी कविता करावी... पण माझी कविता फक्त तुझ्याचसाठी असावी...!! मी नाही म्हणत, कधी तुला मीच दिसावं... पण माझे डोळे बंद होताच स्मरणात तुझीच दिसावीस...!! मी नाही म्हणत, तुझं जगण माझ्यासाठी बदलावं... पण माझं स्वप्न, जगण हे तुझ्या कुशीत पूर्ण व्हावं...!! मी नाही म्हणत, माझ्या भावनांसोबत खेळू नको... पण माझं तुझ्यावर खरच प्रेम आहे हे तू विसरू नकोस...!! मी एवढच म्हणतो, माझ्या प्रेमाची जाणीव व्हावी... आणि पुढच्या जन्मी तरी तु माझी अन मी तुझा बनून यावं...!! मी एवढच म्हणतो,❤🌹

0 likes 0 shares
WhatsApp