Back to feed
A
Anika Reddy Love · Marathi · Romantic

मी मेल्यावर अर्थीजवळ उभी रहा.. अणि स्तब्ध नयनांनी सगळ पहा.. आसवांना मात्र स्पष्टपणे सांग घोळ घालायचा नाही.. तो मेला आहे.. त्याचा हट्ट धरायचा नाही.. आग विझल्यावर मग थोडी जवळ जा.. कुठे वाचलो का मी एकदा निरखून पहा.. स्वतःला सांग व्हायच ते होऊन गेलं.. वेड्याचं आयुष्य वेड्यातच गेलं.. उसासा टाकुन मग कामाला लाग.. शेवटच एकदा माझ्याशी वैर्या सारखी वाग.. थोडीशी राख माझी बांधून घे.. जड़ झाली तर वहायला नदीवर ने.. राख नदीत वाहून दे.. सगळ काही संपलं असेल.. जे झाल माझ्या संगे तुझ्या.. ध्यानात ही उरल नसेल.. संपलेल्या खेळाचा मग तू.. संपून टाक डाव.. फ़क्त वहायचा आधी राख.. एकदा हृदयाला लाव.. बघ..राखेचा एक कण तुझ्या.. हातावर राहिल.. शेवटच का होईना तुझ्याकड़े आशेने पाहिल.. त्यालाही तुझा अश्रुची चव.. तू कळवणार का..? विझवून अश्रुत एकदा पुन्हा त्यास्.. जळवणार का..?

0 likes 0 shares
WhatsApp