मागून कधी प्रेम मिळत नसते ना बळजबरीने ते घेता देता येते त्याचे कोंब मनामनात लागतात रुजवावे तेव्हा हे इवलेसे रोपटे खरे तर मनात तगते आणि नकळत कोणी मनमंदिरात विराजते ना तोडु म्हणता तुटतात हे चिवट धागे ना जोडू म्हणता जुळतात हे बंध रेशमाचे नकळत कशी ही रेशीम गाठ बसते ना लागू पडतात त्यासाठी नियम व्यवहारीजगताचे आपल्या नकळत आपले जगणे हवेहवेसे वाटते ह्या परिमळाने जीवन गंधीत होते..!!
0 likes
0 shares