मंगेश पाडगांवकर - : मी कुठे म्हणालो "परी" मिळावी.. एवढंच की जरा "बरी" मिळावी.. प्रयत्न मनापासून आहेत मग.. किमान एक "तरी" मिळावी..! स्वप्नात तशा खूप भेटतात.. कधीतरी "खरी" मिळावी.. हवीहवीशी एक जखम.. एकदातरी "उरी" मिळावी..!! गालावर खळी नको तिच्या.. फक्त जरा "हासरी" मिळावी..! चंद्राइतकी सुंदर नकोच.. फक्त जरा "लाजरी" मिळावी..!! मी कुठे म्हणालो "परी" मिळावी.. एवढच की जरा "बरी" मिळावी..!! ( - मंगेश पाडगावकर) -------------------------"---- तीची कविता:- ती कुठे म्हणतेय "देखणा" मिळावा... ती कुठे म्हणतेय "देखणा" मिळावा.. एवढंच की जरा "शहाणा" मिळावा.. प्रयत्न शंभर आणे आहेतच मग किमान एक "आणा" मिळावा..! सिनेमात तसे खूप भेटतात कधी तरी अंगणात भेटावा.. हवा हवासा असा छोटासा एक तरी "नजराणा" मिळावा नुसती छप्पन इंचाची छाती नको मनाचा "सच्चा बाणा"असावा सूर्या इतका तेजस्वी नको पण प्रेमात कधी "ऊणा" नसावा ती कुठे म्हणतेय "देखणा" मिळावा एवढंच कि जरा "शहाणा" मिळावा ------------------------------
149 likes
40 shares