Back to feed
A
Aadhya Bhat Love · Marathi · Romantic

मंगेश पाडगांवकर - : मी कुठे म्हणालो *"परी"* मिळावी.. एवढंच की जरा *"बरी"* मिळावी.. प्रयत्न मनापासून आहेत मग.. किमान एक *"तरी"* मिळावी..! स्वप्नात तशा खूप भेटतात.. कधीतरी *"खरी"* मिळावी.. हवीहवीशी एक जखम.. एकदातरी *"उरी"* मिळावी..!! गालावर खळी नको तिच्या.. फक्त जरा *"हासरी"* मिळावी..! चंद्राइतकी सुंदर नकोच.. फक्त जरा *"लाजरी"* मिळावी..!! मी कुठे म्हणालो *"परी"* मिळावी.. एवढच की जरा *"बरी"* मिळावी..!! ( - *मंगेश पाडगावकर*) -------------------------"---- 👌👌👌👍👍👍 *तीची कविता:-* ती कुठे म्हणतेय *"देखणा"* मिळावा... एवढंच की जरा *"शहाणा"* मिळावा.. प्रयत्न शंभर आणे आहेतच, मग किमान एक *"आणा"* मिळावा..! सिनेमात तसे खूप भेटतात , कधी तरी *"अंगणात"* भेटावा.. हवा हवासा असा छोटासा, एक तरी *"नजराणा"* मिळावा नुसती छप्पन इंचाची छाती नको, मनाचा *"सच्चा बाणा"*असावा सूर्या इतका तेजस्वी नको, पण प्रेमात कधी *"ऊणा"* नसावा ती कुठे म्हणतेय *"देखणा"* मिळावा एवढंच कि जरा *"शहाणा"* मिळावा *----------------*

0 likes 0 shares
WhatsApp