___*मंगेश पाडगावकरांची एक अप्रतीम कविता* 🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼 *आ*युष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं....! रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं...! *शे*वटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्म असतं...! मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं...! *हो*णाऱ्या चुकांना टाळायचं असतं, कुठलंच पान कधी गाळायच नसतं....! चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं.....! *ना*ती जपण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे *न*शीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायच नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं *आ*हात तुम्ही "सावरायला" म्हणुन "पडायला" आवडते, आहात तुम्ही "हसवायला" म्हणुन"रडायला" आवडते, आहात तुम्ही "समजवायला" म्हणुन "चुकायला" आवडते, *मा*झ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे "सगळे ""म्हणुन मला "जगायला" आवडते...*
V
Vihaan Yadav
Motivation · Marathi · Motivation
149 likes
66 shares