मंगेश पाड़गांवकरांची एक अत्यंत सुंदर अर्थवाही कविता ! " सा रं का ही स्व तः सा ठी " देवधर्म पूजाअर्चा सारं असतं स्वतःसाठी देवाला यातलं काही नको असतं स्वतःसाठी फुलं अर्पण करतो देवाला ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून ? सारी पृथ्वीच ज्याचा बगिचा त्याला काय करायचंय फुलं घेऊन ? नैवेद्य जो आपण दाखवतो तो काय देव खातो ? तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं भरणपोषण करीत असतो ! निरांजनाच्या इवल्या ज्योतीने ओवाळतो आपण प्रभूला चंद्रसूर्य जातीने हजर ज्याच्या दिमतीला स्तोत्रं त्याची गातो ती काय हपापलाय म्हणून स्तुतीला ? निर्गुण निराकार जो त्याला अवडंबर हवंय कशाला ? सारं काही जे करायचं ते स्वतःसाठीच असतं करायचं , प्रार्थनेनं देव बदलत नसतो स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं ! आवडलेल्या आमटीचा आवाज करीत मारता भुरका विश्वास ठेवा यात काही पाप नाही , आनंदाने जगायचं नाकरणं याच्यासारखा दुसरा शाप नाही ! जबरदस्त डुलकी येते धर्मग्रंथ वाचता वाचता ! लहान बाळासारखे तुम्ही खुर्चीतच पेंगू लागता ! विश्वास ठेवा यात काही पाप नाही , आनंदाने जगायचं नाकारणं याच्यासारखा दुसरा शाप नाही ! देवळापुढील रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता ! गरम कांदाभजी खाऊन पोटोबाची पूजा करता ! विश्वास ठेवा यात काही पाप नाही , आनंदाने जगायचं नाकारणं याच्यासारखा दुसरा शाप नाही ! प्रेमाची हाक येते तुम्ही धुंद साद देता ! कवितेच्या ओळी ऐकून मनापासून दाद देता ! विश्वास ठेवा यात काही पाप नाही , आनंदाने जगायचं नाकारणं याच्यासारखा दुसरा शाप नाही -- मंगेश पाडगावकर--
251 likes
54 shares