Back to feed
I
Ishaan Reddy Love · Marathi · Romantic

मीच निरंतर बोलत राहतो तू फक्त मला पाहत राहते तुझ्या एकटक पाहण्याचं कारण मला तुझ्याकडून ऐकायचंय मी भरभरून बोलत जातो तू मौन धरून ऐकत राहतेस तुझ्या शब्दांना कैद ठेवण्याच कारण मला तुझ्याकडून ऐकायचंय माझ्या शब्दांना दिलखुलास दाद देणं प्रत्येक शब्दांचा अर्थ समजावून घेण तुझ्या या देवाणघेवाणीच कारण मला तुझ्याकडून ऐकायचंय माझ्यावर कि माझ्या शब्दांवर तुझ प्रेमच मला कळत नाही मग…. शब्द अगोदर कि मी ?? मला तुझ्याकडून ऐकायचंय मी नेहमीच्या जागी वाट पाहणं तू नेहमीप्रमाणेच उशिराने येणं तुला उशीर होण्याचं नवीन कारण मला खरंच तुझ्याकडून ऐकायचंय….

0 likes 0 shares
WhatsApp