माझे अतिशय आवडते मराठी भावगीत..... I always use to sing this beautiful Song in my Musical Prog. तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी एकांती मज समीप तीच तूहि कामिनी ! ॥धृ॥ नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे छायांनी रेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी ॥१॥ सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे ? मीहि तोच, तीच तूही, प्रीति आज ती कुठे ? ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी ॥२॥ त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी ॥३॥ गीत - शांता शेळके संगीतकार व गायक- सुधीर फडके राग- यमन
0 likes
0 shares