माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर...!! तसं, तुझं ही प्रेम आहे का रे माझ्यावर...? रात्रं दिवस तुच नजरेसमोर असतोस... जवळ असुनही, दुर दुर असल्याचा भासतोस... खुप प्रेम करते रे तुझ्यावर... पण, नाही करू शकत रे व्यक्त ते... मला खुप बोलावसं वाटतं रे तुझ्याशी... तसं, तुला नाही का रे वाटत, बोलावसं माझ्याशी...? माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर...!! अगं वेडे...! खरच का गं...? अगं....! माझं ही खुप प्रेम आहे तुझ्यावर...!! जसं, तुझं ही प्रेम आहे माझ्यावर...!! मनातलं सर्व बोलुन टाकावं वाटतं तुला... पण.....! हे मन घाबरते गं तुला... भिती वाटते तुझी... आत्ता आहेस जवळ, पण, नंतर दुरावण्याची... माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर...!! अरे वेडया...! बोल ना मग, मनातलं सर्व तुझ्या... मी ही आतुर झाले, ते शब्द कानी पडण्यासाठी माझ्या... हो गं...! आता नाही वाटत भिती, मनातलं माझ्या सांगायला... हो नाही वाटत...! की... माझं ही खुप प्रेम आहे तुझ्यावर...!! जसं, तुझं ही प्रेम आहे माझ्यावर...!! हो...! माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर...!!
0 likes
0 shares