माझी ती मैत्रीण अशीच असावी…… खोटे बोललो की चटकन पकडून खुप सुनावणारी , माझं काही चुकलं तरी मला सावरून वाट दाखवणारी , तिच्याही मनातलं नकळत मला सांगणारी अन माझ्या मनातलं अलगद ओळखणारी , माझी ती मैत्रीण अशीच असावी…… ओरडल्यावर मला ती खुप तिखट वाटावी अन लाडाने बोलल्यावर दुधावरच्या सायसारखी वाटावी , मला तिचा गुंतलेला प्रोब्लेम हक्काने सांगणारी अन माझा प्रोब्लेम चटकन मिनटात सोडवणारी , माझी ती मैत्रीण अशीच असावी…… कुठे हरवलो मी तर लगेच इंद्रधनुप्रमाणे क्षितिजावर दिसावी अन दिसल्यावर विसरलास कारे मला म्हणून जाब विचारणारी , कितीही तिखट आणि रागावणारी असली तरी , अन कधीच मला न विसरणारी आणि मला समजून घेणारी , माझी ती मैत्रीण अशीच असावी……💝💝💝💝💝💝💝💝💝💝
0 likes
0 shares