माझा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन ...... कुणाला आवडेल तर कुणाला नाही ... प्रेम कर मित्रा.. कोणावर ही कर.. पण प्रेम कर.. बाजूच्या बाकावरल्या तीच्यावर कर.. नाहीतर .. समोर जी शिकवतेय तिच्यावर कर.. पडद्यावरल्या हिरोईनवर कर.. नाहीतर तिच्या ड्रेसच्या डिजाइनवर कर.. कारण… प्रेमात पडण्याची आणि पाडण्याची ताकत सर्वांत असते… प्रेम ही स्वत:पलीकडे पहाण्याची सुरुवात असते पण… प्रेम कर मित्रा.. प्रेम आईवर कर.. ताई वर कर.. अंगणातल्या जाई वर कर.. हंबरणार्या गाईवर कर जगातल्या कोणत्याही बाईवर कर कारण.. लक्षात ठेव … प्रेम आहे .. तिथे आदर आहे अंग झाकणारी .. मायेची चादर आहे… प्रेम कर मित्रा.. प्रेम मित्रांवर कर .. घरच्यांवर कर.. तितकच सर्वावर कर आणि हो .. विसरू नकोस .. स्वत:वर कर.. स्वत:इतकाच … दुसर्यांच्या मतावर कर.. कारण … प्रत्येक जण स्वत:च्या कहाणी चा नायक असतो आणि कोणाच्या तरी कहाणीचा सहाय्यक असतो तेव्हा…. प्रेम कर मित्रा प्रेम कर मनगटावरल्या राखीवर कर… ह्र्दयातल्या सखीवर कर… हरवलेल्या नात्यांवर कर… जे जे आठवेल त्यां त्यां वर कर.. पहिल्यांदाच झालेल्या हशावर कर आणि सरतेशेवटी मिळालेल्या यशावर कर… जगण्यावर करतोस तितकच मरणावर कर… कृष्णावर करतोस तितकच कर्णावर कर … फक्त एक लक्षात ठेव मित्रा… प्रेमात अधिकार गाजवू नकोस… प्रेमाचं अवडंबर माजवू नकोस .. प्रेमाचं अवडंबर माजवू नकोस.. मी सर्वावर च प्रेम करतो …। प्रेम कसेही करावे ... अगदी बिनधास्त करावे !!💖 "जमेल तसे प्रत्येकाने... .....कुणावर तरी प्रेम करावे... जिथे खरंच प्रेम असतं...... तिथे व्यक्त करायला कोणत्याही दिवसाची गरज पडत नाही ...!! प्रेम हे फक्त प्रेम असत...
0 likes
0 shares