माझं पिल्लू असह्य होती वेदना कधी होईल रे ही सुटका कंठाशी आले प्राण कधी येईल रे ती घटिका दिसताच पिल्लु माझे मनसागर भरती येई गगनास छेदुनि हर्ष मी खुशित हसते "आई" डोळ्यांत साठवे मी हास्य तुझे गोंडस भरुन पावले मी मम कुशीतले पाडस किति गोड तुझे रुपडे माझाच अंश छान मलाच माझा हेवा देवा तुझेच रे वरदान
0 likes
0 shares