माझी माय... .हंबरून वासरा ले चाटती जवा गाय ,तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय.. .आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा ,दुष्काळात मायेचा माझ्या आटला होता पाणा ,पिठामंदी, पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय,तवा मले पिठामंदी दिसती माझी माय,दिसती माझी माय... कण्या काट्या येचायालामाय जाई रानी , पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी ,काट्याकुट्यालाही तिचंमानत नसे पाय , तवा मले काट्या मंदीदिसती माझी माय ,दिसती माझी माय..... बाप माझा रोज लावी मायीच्या माग टुमण ,बास झाल शिक्षण आता घेवुदी हाती काम , आग शिकून शान कुठ मोठा मास्तर होणार हाय ,तवा मले मास्तर मंदीदिसतीमाझी माय दिसती माझी माय..... दारू पिऊन मायेला मारीजवा माझा बाप ,थरथर कापे अनलागे तिला धाप , कसायाच्या दावणी लाबांधली जशी गाय , तवा मले गायी मंदीदिसती माझी माय ,दिसती माझी माय... ..अन बोलता बोलताएकदा तिच्या डोळ्या आलं पाणी ,सांग म्हणे राजा कवा दिसलं तुझी राणी ,भरल्या डोळ्यान कवापाहीन दुधावरची साय ,तवा मले सायी मंदीदिसती माझी माय ,दिसती माझी माय.... अग म्हणून म्हणतो आनंदानेभरावी तुझी वटी ,पुन्हा एकदा जन्म घ्यावामाये तुझ्या पोटी , तुझ्या चरणी ठेऊन मायाधराव तुझ पाय ,तवा मले पायाम
107 likes
82 shares