Back to feed
K
Kavya Mehta Love · Marathi · Romantic

माझी मुलगी मोठी झाली. एकेदिवशी सहज म्हणाली, " पप्पा मी कधी तुम्हाला रडवलय का ?" मी म्हटलं,"कारे पिलू आसं का विचारतेस ?" ती :- काय नाही असच मी :- नीट आठवत नाही , पण एकदा ती :- "कधी ?" तिनं अधिरतेनं विचारलं. मी म्हणालो," तु एक वर्षाची असताना मी तुझ्या समोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं कारण मला बघायचं होतं तु काय उचलतेस. तुझी निवड ठरवणार होती की मोठेपणी तु कशाला जास्त महत्व देतेस. जसे पैसे म्हणजे संपत्ती, पेन म्हणजे बुद्धी आणि खेळणं म्हणजे आनंद. मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो. मला बघायची होती तुझी निवड. तु एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतीस आणि मी पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो. तु रांगत रांगत पुढे आलीस, मी श्वास रोखून पहात होतो आणि क्षणार्धात तु त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस. माझ्या लक्षातच नाही आलं की या सगळ्यांबरोबर मी सुद्धा एक निवड असू शकतो. ती पहिली वेळ होती जेव्हा तु मला रडवलसं.!!!

238 likes 28 shares
WhatsApp