Back to feed
A
Aarav Nair Love · Marathi · Romantic

माझी वाट बघत तू खिडकीत उभी असावी..... माझ्या येण्याची चाहूल लागून सुद्धा पाठमोरीच राहावी... मोगऱ्याचा गजरा, मी हळूच तूझ्या केसात माळतांना तूही तुझ्यासकट त्या मोगाऱ्या सारखीच दरवळावी........ माझे हात तूझ्या कमरे भवती आणि तुझ्या श्वासांची कुजबुज माझ्या कानाला जाणवावी.... हळूच मग मी टेकवावेस ओठ तूझ्या मानेवर.... तू शहारून मिठी मारत माझ्यामधे गुंतून जावी.... अशी गुलाबी संध्याकाळ, सखे एकदा तरी यावी....😍

0 likes 0 shares
WhatsApp