माझं स्वप्नं मी पाहतो नेहमी एक स्वप्नं जागेपणी तीच तू , तोच मी , डोळ्यातून बोलणारी , स्पर्शातून फुलणारी , ती प्रीतही तशीच आहे. पण आज आहेत आपल्याभोवती, सुखदु:खाच्या चार भिंती, आपल्या छोट्याशा विश्वाची, आपल्यापुरती समाप्ती. या वात्सल्य विश्वात , रांगतंय भविष्य आपलं एक सुंदर गोड स्वप्नं , आपल्या प्रीतीला पडलेलं ! माझं एव्हढ स्वप्नं, जरा पहाटेला कळू दे. तुझ्या कुशीत माझ्या, प्रेमाचा अंकुर फुलू दे.....
0 likes
0 shares