माझी हार? बरेच दिवसां पासून तुला सांगायचे आहे, आज एकदाचे सांगून मुक्त होऊ दे. तुला समजेल न समजेल माहित नाही मला, पटले तर ठीक नाही तर हा विषय सोडून दे. का नेहेमी जिंकणारा मी आज हरलो, तुलाही थोडे जरा ते उलगडू दे. अतोनात प्रयत्न केले तुझ्या योग्य होण्यासाठी, तुला नेहेमी सुखी पाहण्यासाठी, तुझ्या पासून सर्व संकटे दूर ठेवण्यासाठी, कधी सखा म्हणून समजून घेण्यासाठी, तर कधी जोकर बनून हसवण्यासाठी, कधी वाटाड्या होऊन मार्ग दाखवण्यासाठी, कधी गुरु म्हणून शिकवण्यासाठी, तर कधी हळवा होऊन मनातलं सगळे दाखवण्यासाठी, फक्त एका आशेसाठी, कधीतरी तुझ्या प्रेमाच्या योग्य होण्यासाठी. का कळत नाही ग तुला माझ्या मनातलं, तुझ्या प्रेमासाठी सदैव हे आसुसलेलं. आणि तू म्हणतेस माझ्या भावना तुला टोचतात, माझे शब्दही तुझ्या मनाला बोचतात. नाही वाटत मी तुला कधी योग्य दिसेल, मात्र माझं मन आजच हार मानून बसेल. -- साला खडूस!
0 likes
0 shares