माझीच हार तू, माझीच जित तू, माझीच प्रित तू, हो... माझीच तू...!! ° मन वेडा मी अन् प्रित माझी तू, ओठांवरी माझ्या गीत आहेस तू...!! ° कधी जवळ, कधी दुर, कधी प्रेमात आनतेस पुर, माझाच ध्यास तू, माझीच आस तू, हो... माझीच तू...!! ° कधी बावरी माझ्या भेटीत तू, कधी लाजरी माझ्या मिठीत तू...!! ° कधी सावली, कधी ऊन, कधी रिमझिम पाऊस बनून, माझ्यात वास तू, माझ्यात श्वास तू, हो... माझीच तू...!! ° मनात तू, ह्रुदयात तू, नसानसांतल्या रक्तात तू...!! ° माझाच जिव तू, माझाच प्राण तू, माझीच तू, हो... फक्त माझीच तू...!!
0 likes
0 shares