Back to feed
V
Vivaan Kulkarni Love · Marathi · Romantic

माझ्या मनाप्रमाणे माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही मन कोडगे तरीही स्वप्ने पहात राही माझ्या मनाप्रमाणे माझाच देह नाही विनवूनही मनाने संयत रहात नाही माझ्या मनाप्रमाणे माझेच कर्म नाही कर्तव्य भावनांच्या संगत रहात नाही माझ्या मनाप्रमाणे माझेच प्रेम नाही मीही अनेकवेळा त्याची रहात नाही माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही जाणूनही अपेक्षा करणे रहात नाही

0 likes 0 shares
WhatsApp