Back to feed
A
Anika Rao Spiritual · Marathi · Spiritual

माझ्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल, तर ते मी आशीर्वादच समजतो ....... माझी कुणी स्तुती करत असेल, तर ती मी प्रेरणा समजतो....... माझ्यावर कोणी खोटेनाटे आरोप करत असेल, तर ती मी माझ्या सत्याची ताकद आहे असे समजतो.... मला कोणी मनापासून साहेब म्हटले, तर माझ्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजतो...... अकारण कोणी माझ्या मार्गात आडवे येत असेल, तर ती माझ्या मार्गाची मी साफसफाई समजतो..... उगाचच माझ्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल, तर तो माझ्यातल्या नम्रतेचा विजय समजतो..... माझ्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा, मी योग्य मार्गावर आहे असे समजतो...!! समोरचा, परिचित किंवा जवळचा माझ्याशी वाईट आणि कितीही कपटीपणाने वागत असेल तरीही मी मात्र त्याच्याशी तसाच वागत नाही, कारण तो तसा आहे.......मी नाही.!!

218 likes 39 shares
WhatsApp