माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे , डोळ्यापुढे माझ्या गा तुझेच चित्र आहे तुझे रूपवर्णन करण्यापलीकडे शब्दही अपुरे , हातात माझ्या अझुनी ते अपूर्ण पत्र आहे एका कटाक्षाने घालीले भुरड असे हृदयाला हा तळमळतो तुझ्यासाठी,धीर देतो मी पात्र आहे ओढणीच्या ढगाला सरसावून बघणं झरा चंद्रमुखी , विखुरलेल्या वस्तीत ग काळोख सर्वत्र आहे प्रत्येक दिवस मोहरतो मिळण्याच्या तृप्त आशेने , स्वनांच्या गंधात बहरलेली प्रत्येक रात्र आहे आज कळलय मला गगन रूप खरे प्रेमाचे ना वैरी कुणी प्रेमासारखा ना कुणी मित्र आहे .
0 likes
0 shares