Back to feed
M
Manav Bose Love · Marathi · Romantic

माझ्यासाठी तु एक कथेतील पात्र ! तु भेटलीस मी लिहीत राहीलो तु बोललीस मी लिहीत राहीलो तु मनापासुन बोलायचीस मी त्यात काव्य शोधायचो तु खळखळुन हसायचीस मी त्यात सौंदर्य पहायचो तु भांडायचीस..चिडायचीस ते मला इंट्रस्टटिंग वाटायचं! तु म्हणायचीस..हलकट आहेस त्यात मला प्रेम दिसायचं! जेव्हा तुला सत्य कळेल तेव्हा माझ्यातल्या लेखकाचा तु नक्कीच द्वेष करशिल चुकीच्या व्यक्तीला भेटलीस म्हणुण हळहळशिल शेवटी मी एक लेखक अन तु माझ्या कथेतील पात्र बस्स,एव्हढच आपल नातं! माझ एक चुकलं तु धाकात रहावं अस मला का वाटावं? तुला "बस" म्हटलं की बसाव तुला "उठ" म्हटल की उठाव अस मला का वाटावं? काही पात्र बंडखोर असतात ते कोणालाच जुमानत नसतात हव तस वागतात हव तिथे जातात हवं ते करतात नैतिक अनैतिक ते लेखकासाठी सोडतात. मी विसरलो एक अलिखित नियम पात्राला त्याच्या स्वभावानुसार वागु द्यायच असतं अन लेखकान कधी पात्राच्या प्रेमात पडायच नसतं त्यामुळे लेखकातला लेखक उरत नाही अन कथेचा शेवट कधी पुर्ण होत नाही!

0 likes 0 shares
WhatsApp