माझ_ही_तुझ्यावर_खूप_प्रेम_आहे.... जेव्हा मी १५ आणि तू ११ वर्षाची होतीस... मी म्हणलो... माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे... तू विचारलस ते काय असतं ..? आठवतंय..? मी २५ व्या वर्षी तुला म्हणालो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो... तू म्हणालीस...मला एकटी तर नाही ना सोडणार..? आणि अलगद माझ्या मिठीत विरघळलीस...!! ३५ व्या वर्षी ... जेव्हा एकदा मी रात्री उशिरा घरी आलो.. तू आणि मी सोबतचं डिनर घेतलं... मी तुला जवळ ओढून म्हणालो...I love you...!! तू माझ्या कपाळावर ओठ टेकवत म्हणालीस.. I know that.. पण सकाळी मुलांचा पेपर आहे... उशीर नको व्हायला आता जास्त...आता झोपू यात लवकर...!! माझ्या ५० व्या वाढदिवशी सगळे पार्टी मध्ये गुंग असताना, मी हळूच म्हणालो...I love you very much तू हसत हसत म्हणालीस ...माहित आहे अगदी २० वर्षा आधी पासून माहित आहे.. आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून गेलीस...!! तेव्हा मी ६० वर्षाचा झालो होतो... आपल्या मुलाच्या लग्नात तू घातलेली पैठणी पाहून मी म्हणालो. छान दिसतेसं आणि अलगद तुला जवळ करून म्हणालो, तू मला खूप आवडतेस...आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे... तू मला बाजूला सारत म्हणालीस...ते ठीक आहे हो...!! पण सगळ वेवस्थित अरेंज झालाय ना..? मी आत ७५ वर्षाचा.., आराम खुर्चीवर बसून, आपला जुना अल्बम बघत होतो..., तू स्वेटर वीणत होतीस नातवांसाठी मी म्हणालो माझं तुझ्यावर अजून ही तितकचं प्रेम आहे ..! आणि तू म्हणालीस, माझं पण तुझ्यावर आजही तितकचं प्रेम आहे जितक तुला होकार देताना होत.. माझ्या हातातील तो आठवणींचा साठा असलेला अल्बम पूर्ण भिजून गेला... डोळ्यातून पडणारे थेंब अनावर होत होते कारण आज इतक्या वर्षांनी तू स्वतः म्हणाली होती तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस म्हणून...!! फक्त प्रेम पुरेसे नसते. कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काहीच नको असतं... त्याला ओढ असते ती फक्त ते शब्द ऐकायची जे सांगतात.. हो माझं पण तितकाच प्रेम आहे तुझ्यावर जितकं तुझ माझ्यावर आहे, म्हणून जेव्हा पण संधी मिळेल तेव्हा सांगायला चुकू नका.”
0 likes
0 shares