Back to feed
A
Anaya Chauhan Love · Marathi · Romantic

मिटलेली मैत्री मिटलेलीच असू द्यावी उमलली कधी तर अलगद उमलू द्यावी मिटलेपणात ही ती मैत्रिच असते सुखद स्मृतीचे पराग हुंगित असते उचकटून तिला उगा मरू नको जपला गंध कोष उगा जाळू नको मागुन कुणालाच कधी मैत्री मिळत नाही वठलेल्या फांदीवर फुल कधीच उमलत नाही ज्याला लोक जमवलेली मैत्री म्हणतात त्यांच्या डोक्यात फ़क्त फायद्याचे हिशोब असतात ....!!! 👬👬👬👬👬👬👬👬👬 या जगात फक्त त्याच लोकांच्यावर विश्वास ठेवा, जे लोक न सांगताच तुमच्या तीन गोष्टी ओळखत असतील. १. तुमच्या हसण्या मागच दुःख, २. तुमच्या रागा मागच प्रेम, ३. तुमच्या मौना मागच कारण, ज्याना आपला श्वास कळतो त्याना शब्दाची गरज नसते.😊🎸🎶

0 likes 0 shares
WhatsApp