Back to feed
M
Myra Malhotra Motivation · Marathi · Motivation

माणुसकीचा वावर नको ते संस्कार आंधळे भोळे मिटलेले डोळे. अंधश्रद्धेत रूतलेले खोलवरचे पाय. विचारतील तुम्हाला कुठे कधी कशाने ही तुमची जातं काय. त्यावरच ठरेल तुमचा कौल नि डौल ना कर्तव्य ना कर्म महत्वाचं तेवढंच जात अथवा धर्म. जातं नि कुळ कसे कुणी उकळायचे. राजधर्म कुणी सांगायचे.. आमचीच वरची नि तुमची खालची. सांगतात प्रतिनीधी धुर्त समाजाचे... माणुसकीचं आश्चर्य इथं कशावर.. शोधा तुम्ही पृथ्वी वगळता दुस-याच ग्रहावर...

85 likes 51 shares
WhatsApp