✨💛मैत्री.... चालता चालता अलगद हात हाती यावा ... हसण्यात अश्रू विरून जावा अशी मैत्री असावी. मनमोकळेपणाने बोलता यावं, वेळेचंही भान नसावं अशी मैत्री असावी. थकल्यानंतर झाडाखाली बसावं अन् ... न सांगताही मनातलं ओळखावं ... अशी मैत्री असावी. दोन घडी भेट झाली नाही तर चुटपुट लागावी.... भेटल्यावर मात्र भडाभडा बोलावं... अशी छान मैत्री असावी. एकाचं दु:ख दुसर्याला कळावं अन् आठवण होताच हलकं स्मित झळकावं अशी मैत्री असावी. न रुसवा, ना अबोला, ना ईर्षा, ना बढाया, ना भूलथापा, ना अविश्वास, फक्त आनंदच वाटावा... मैत्री अशी असावी...💛✨
0 likes
0 shares