मित्र बोलतात मला,आठऊ नकोस रे तिला,तिला तू विसरण्याचा प्रयत्न कर...ती नव्हतीच कधी तुझ्यासाठी,हे आता, मानण्याचा तू प्रयत्न कर...ती परत येणार नाही तुझ्या आयुष्यात,....उठ आता,अन पुढे चालण्याचा तू प्रयत्न कर...सिगरेटच्या धुरात शोधणं, सोडून दे रे तिला,ती गेली हे मानून,आता तरी तू जगण्याचा प्रयत्न कर...रडणं सोड रे तिझ्यासाठी तू आता,उघड्या डोळ्याने, या दुनिये कडे पाहा ,ह्या सुंदर दुनिये कडे पाहता पाहता,आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर...आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर.....
0 likes
0 shares